Thursday, June 2, 2011

शाळेतील दिवसात....



शाळेचे ते जीवन होते, शाळेतले ते जगणे होते
धडपडणाय्रा, भिरभिरणाय्रा पाखरांचे हे एक ठिकाण होते 


सुरुवात व्हायची सकाळी
उशीरा आलेल्यांची दुष्काळी
हातांवर छड्यांची फटकाळी
नाहितर ग्राउंडची साफसफाई


राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना हा आमचा क्रम होता
बातम्या अणि दिनविशेष यांचा चांगलाच जोर होता
वरतुन सुचनांचा तडका
अणि नियमांचा भडका


तासांवर तास अणि त्रासच त्रास
ते पण ५ ते ६ तास 
अणि प्रत्येक तासाचे वेगवेगळे टीचर्स
वेगवेगळे टिचरर्स चे वेगवेगळे विषय
बाप रे बाप !


इंग्रजीची मात्र मजा होती 
पण इतिहासाच्या अभ्यासाला दररोज आमची रजा होती
भुमितीच्या प्रत्येयांनी नेहमी वाजायचे बारा
म्हणुन तर भुगोलाचा करभारच बरा


पण नव्ह्ते कशाचे टेन्शन
ना कशाची चिंता
होता स्वछंदी पाखरांचा थवा


कधि कधि वाटते ते दिवस परत यावे
शाळेच्या त्या वर्गात जावुन बसावे
मैत्रिनींचे तेच रुसवे फुगवे
पुन्हा एकदा अनुभवावे...
शाळेचे ते दिवस एकदा पुन्हा यावे.